तुम्हाला माहित आहे का? या लोकांचे बनू शकत नाही आयुष्यमान कार्ड! Ayushman Card Eligibility

2 Min Read
🔴 हेही वाचा🤞

Ayushman Card : सध्या राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील करोडो महिलांना फायदा होत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या स्त्रियांना आर्थिक मदत म्हणून अशा प्रकारच्या योजना शासनामार्फत राबविल्या जातात, आज आपण केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अशाच एका फायदेशीर योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या योजनेचे नाव आहे आयुष्यमान भारत योजना. (Discover the eligibility criteria for Ayushman Card. Learn who qualifies and who cannot get the benefits under the Ayushman Bharat Scheme for free medical treatment).

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत ही योजना केंद्र सरकारणे आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा गरजू लोकांसाठी सुरु केलेली एक योजना आहे. या योजनेद्वारे  मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. तर चला मग जाणून घेऊयात या योजनेद्वारे किती रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो, आणि ही योजना कोणासाठी आहे व कोठे कोठे चालते? 

ज्या लोकांचे आयुष्यमान कार्ड बनते त्यांच्यासाठी काही सूचीबद्ध (जे हॉस्पिटल स्कीममध्ये नोंदणीकृत आहेत) अशा हॉस्पिटलमध्ये वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार घेता येतात. त्यांचे आधार कार्ड सारखे एक कार्ड बनवले जाते ज्यास आयुष्यमान कार्ड म्हणतात. व हा पाच लाख रुपये खर्च सरकार मार्फत केला जातो.

हे लोक बनवून घेऊ शकतात आयुष्मान कार्ड

आयुष्मान कार्ड बनवून घेण्यासाठी काही पात्रता निकष आहेत, खाली सांगितलेल्या लोकांचे आयुष्मान कार्ड बनू शकते.

  • ज्यांच्या कुटुंबात एखादी अपंग व्यक्ती असेल 
  • जे असंघटित क्षेत्रात काम करतात 
  • जे लोक रोजंदारीवर काम करतात 
  • जे लोक अनुसूचित जाती किंवा जमातीतील असतील 
  • जे लोक निराधार किंवा आदिवासी असतील तर
  • जे लोक ग्रामीण भागात राहतात 

तसेच त्याचबरोबर असेही काही लोक आहेत जे त्यांचे आयुष्मान कार्ड बनवून घेऊ शकत नाहीत, चला तर मग जाणून घेऊयात ते कोण लोक आहेत?

हे लोक बनवून घेऊ शकत नाहीत आयुष्मान कार्ड

  • जे संघटित क्षेत्रात काम करतात
  • जे लोक ESIC चे लाभ घेतात
  • ज्या लोकांचा pf (प्रॉव्हिडंट फंड) कट होतो
  • जे लोक आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहेत
  • जे लोक सरकारी कर्मचारी आहेत
  • जे लोक कर भरतात

वरील लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा घेता येत नाही म्हणजेच त्यांचे आयुष्यमान कार्ड बनू शकत नाही.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article