Mahilansathi Sarkari Yojana in Marathi : देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार (Government) आणी राज्य सरकार (Maharashtra) महिलांसाठी विविध योजना (Schemes) राबवत आहे. या सरकारी योजनांच्या माध्यमातून महिलांना (Women) आर्थिक पाठबळ देऊन आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा उद्देश आहे. महिलांसाठी शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा सर्व महिलांनी लाभ घेतला पाहिजे. आज येथे आपण अशाच महिलांना फायदा मिळवून देणाऱ्या काही सरकारी योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Sarkari Yojana For Women: देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या हेतूने केंद्र सरकार (Government) आणी राज्य सरकार (Maharashtra) कडून विविध योजना (Schemes) राबवल्या जात आहेत. या फक्त महिलांसाठीच्या योजनांच्या माध्यमातून महिलांना (Women) पाठबळ देण्याचा सरकारचा उद्देश आहे. महिलांसाठी सरकार अनेक फायदेशीर बचत योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. म्हणून सर्व महिलांना या योजनांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना कोणत्या आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (Government Schemes for Women / Mahila Yojana in Marathi).
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC)
महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्र सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली होती. ही फक्त महिलांसाठी योजना असून ही एकरकमी ठेव योजना आहे. यामध्ये एकाच वेळी गुंतवणूक केली जाते. त्याचा परिपक्वता कालावधी केवळ दोन वर्षांचा आहे. 18 वय वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही भारतीय मुलगी किंवा महिला महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक करू शकते. या योजनेमध्ये एकावेळी जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवता येतात. सध्या MSSC वर 7.5 टक्के व्याजदर सुरु आहे. महिला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सन्मान बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक करु शकतात.
🔴 हे वाचायचं विसरू नका 👉 Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव आले नाही तर? येथे करा हरकतींची नोंद.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक केली जाते. मुलीच्या पालकांना मुलीचे लग्न, शिक्षण यांसारख्या कामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, फक्त 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठीच खाते उघडता येते. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर सुकन्या समृद्धी खाते परिपक्व होते. यामध्ये किमान फक्त 250 रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत तुम्ही एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेची खास बाब म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80C चा देखील लाभ मिळतो.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ( PMMVY)
( PMMVY ) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही मोदी सरकारची महिलांसाठी असणारी महत्वाची योजना आहे. गर्भवती आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ही योजना आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्देश्य महिलांचे आरोग्य सुधारून त्यांच्यातील कुपोषण दूर करणे, त्यांना वेळेवर आणी उपचार आणि औषधांचा खर्च देणे हा आहे. पीएम मातृ वंदना योजनेत गरोदर आणि स्तनदा मातांना पाच हजार रूपये रोख दिले जातात. हे पाच हजार रूपये तीन हप्त्यात डीबीटीद्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. गरोदर महिलांना या योजनेत रजिस्ट्रेशन करताना 1000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. सहाव्या महिन्यात पहिल्या तपासणीनंतर 2000 रूपयांचा दुसरा हप्ता मिळतो. आणी बाळाच्या जन्मानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर 2000 रूपयांचा तिसरा हप्ता मिळतो.