e-Aadhaar Card Download Process in Marathi : आधार कार्डचा वापर अनेक सरकारी आणि निमसरकारी कामासाठी होतो. जस की, ओळखीचा पुरावा ते सिम कार्ड घेण्यासाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी इ. तर दुसरीकडे, (e-Aadhaar Card) ई-आधारचे स्वतःचे अनेक फायदे आहेत जस की ई-आधार ही आधारची इलेक्ट्रॉनिक प्रत आहे जी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू शकता आणि आवश्यकतेनुसार वापरू शकता, तुमच्याकडे तुमचे ई-आधार आहे का? नसल्यास, तुम्ही काही मिनिटांतच तुमच्या मोबाइलवर ई-आधार डाउनलोड करू शकता, मोबाईल मध्ये ई-आधार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. चला तर मग ई-आधार कस डाउनलोड करायच ते जाणून घेऊयात… (Learn how to download e-Aadhaar on your mobile in just a few steps. Follow our quick guide to get your digital Aadhaar copy from UIDAI’s official website instantly).
ई-आधार कस डाउनलोड करायच?
जर तुम्ही अद्याप ई-आधार कार्ड डाउनलोड केले नसेल, तर खाली सांगितलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.
1: ई-आधार डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar/en वर जावा.
2: येथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील, त्यातील आधार क्रमांकाच्या पर्यायावर क्लिक करा. आणी त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
3: आधार क्रमांक टाकल्यावर तुम्हाला स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल तो कॅप्चा भरा.
4: त्यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा.
5: मिळालेला OTP टाका आणी ‘Verify and Download’ बटणावर क्लिक करा.
6: तुमचे ई-आधार कार्ड डाउनलोड होईल.
तुम्ही डाउनलोड केलेले ई-आधार ओपन करण्यासाठी, तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्म वर्ष पासवर्ड म्हणून टाका. जस की, जर तुमच नाव ‘सागर पाटील’ आणी जन्म वर्ष 1990 असल्यास, तुमचा पासवर्ड असेल, (SAGA1990).