PM Ujjwala Yojana | पीएम उज्ज्वला योजना: आजही देशातील करोडो लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे आजही अनेक महिला स्वयंपाकासाठी लाकूड, शेण, कोळसा इत्यादी पारंपारिक संसाधनांचा वापर करतात. या पारंपारिक संसाधनांचा वापर करून स्वयंपाक केल्याने अनेक हानिकारक वायू बाहेर पडतात. त्यामुळे महिलांना श्वसनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. देशातील महिलांची ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवत आहे. (Know the essential documents required to get a free gas cylinder under PM Ujjwala Yojana. Check eligibility criteria and benefits for women below the poverty line).
पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत LPG गॅस सिलेंडर (Free Gas Cylinder) देत आहे. पण या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ कुणाला मिळतो? ते जाणून घेऊयात…
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारकडून महिलांसाठी सुरु करण्यात आलेली एक योजना असून या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळतो. पुरुष या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. केवळ दारिद्र्यरेषेखालील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येतो.
पीएम उज्ज्वला योजनेसाठी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला पात्र आहेत. पण, जर तुमच्याकडे आधीच एलपीजी गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे. आणी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे लागते.
जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- बीपीएल कार्ड
- बीपीएल यादीतील नावाची प्रिंट
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- वय प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
पीएम उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.