जाणून घ्या नेमकी काय आहे ही, महिलांसाठी मोफत वॉशिंग मशीन योजना? सरकारी एजन्सीचा खुलासा

2 Min Read
Free Washing Machine Scheme Maharashtra Fact Check

Free Washing Machine Yojana Maharashtra : केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या असून त्यांचा देशातील अनेक कुटुंबाना लाभ होतो आहे. सध्या अशीच एक योजना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या योजनेअंतर्गत देशातील महिलांना केंद्र सरकारमार्फत मोफत वॉशिंग मशीन दिले जात आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही योजना नेमकी काय आहे आणि खरच सरकारकडून अशी कोणती योजना सुरु करण्यात आली आहे का? त्याबद्दल जाणून घेऊयात… (PIB debunks viral claims about a Free Washing Machine Scheme for women by the central government. Find out the truth behind the fake message circulating on social media).

युट्यूब चॅनेल ज्ञानमंदिर ऑफिशियलवर 8 मिनिटाचा एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. त्यात केंद्र सरकार महिलांसाठी लवकरच मोफत वॉशिंग मशीन योजना सुरु करत आहे. आणी या योजनेचा देशभरातील महिलांना लाभ होईल असा दावा त्या व्हिडिओत करण्यात आला आहे.

Free Washing Machine Scheme : सरकारी फॅक्ट चेकिंग एजन्सी पीआयबीने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टविषयी स्पष्टीकरण दिले आहे. पीआयबीने सांगितल की, युट्यूब चॅनेल (gyanmandirofficials) ज्ञानमंदिर ऑफिशियलवर एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. त्यात केंद्र सरकार महिलांसाठी लवकरच मोफत वॉशिंग मशीन योजना सुरु करत आहे. आणी देशभरातील महिलांना या योजनेचा लाभ होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ खोटी माहिती पसरवत आहे. अशा पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीपासून सावध राहा. केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केलेली नाही, अशी कुठलीच घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही. असल्या खोट्या दाव्यांपासून दूर राहा. अशा कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेवून तुमची वयक्तिक माहिती, बँक डिटेल्स कोणत्याही वेबसाईटवर/फॉर्म मध्ये भरू नका.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article