Gold Price Today 11 October 2024 : दसऱ्याच्या निमित्ताने सोने खरेदी करण्याची चांगली संधी चालून आली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या भावात घट झाली आहे. आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी देशात 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,630 रुपये आहे. (Gold prices drop ahead of Dussehra! Check today’s gold rates for 22K and 24K gold across major cities in India. Know the latest gold and silver prices on 11th October 2024).
Gold Rate Today 11 October 2024: देशभरात सोन्या-चांदीचे दर उतरताना दिसून येत आहेत. भारतात आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. या दसऱ्याच्या निमित्ताने सोने खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत आज भाव कमी झाले आहेत. बाजारातील जाणकारांनी येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आजचा सोन्याचा दर 11 ऑक्टोबर 2024
शहर | 22 कॅरेट सोन्याची किंमत | 24 कॅरेट सोन्याची किंमत |
---|---|---|
दिल्ली | 70,390 रुपये | 76,780 रुपये |
मुंबई | 70,240 रुपये | 76,630 रुपये |
अहमदाबाद | 70,290 रुपये | 76,680 रुपये |
बेंगळुरू | 70,240 रुपये | 76,630 रुपये |
चेन्नई | 70,240 रुपये | 76,630 रुपये |
चांदीचे भाव
दिल्लीत आज चांदीची किंमत 93,900 रुपये प्रति किलो आहे, तर मुंबईत आज 1 किलो चांदीची किंमत 93,900 रुपये आहे.