Gold Price Today 12 October 2024 : देशात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे भाव आणखी वाढू शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे. कालच्या तुलनेत आज १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सोने महाग झाले आहे. आज 12 ऑक्टोबर रोजी देशात 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold and silver prices rise on Dussehra, 12 October 2024. Find out today’s 22K & 24K gold rates across major Indian cities including Delhi, Mumbai, and more. Check updated prices now).
Gold Rate Today 12 October 2024 : सणासुदीला सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे ही भारतीय संस्कृतीची एक परंपरा मानली जाते. सण असो घरात लग्न किंवा काही खास कार्यक्रम अशावेळी अनेक लोक सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करतात. आज १२ ऑक्टोबर दसऱ्याचा सण, अनेक लोक या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानतात. त्यामुळेच सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या खरेदीची मागणीही लक्षणीय वाढते. दरम्यान, आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून येत्या काही दिवसांत सोने आणखी महाग होऊ शकते. याचे कारण म्हणजे दिवाळी. दिवाळीतही मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते.
आज 12 ऑक्टोबर 2024 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढू शकतात, असे बाजारातील जाणकारांचे मत आहे.
आजचा सोन्याचा दर १२ ऑक्टोबर २०२४
शहर | 22 कॅरेट सोन्याची किंमत | 24 कॅरेट सोन्याची किंमत |
---|---|---|
दिल्ली | 71,110 प्रति 10 ग्रॅम | 77,560 रुपये प्रति 10 ग्रॅम |
मुंबई | 70,960 रुपये प्रति 10 ग्रॅम | 77,410 रुपये प्रति 10 ग्रॅम |
चेन्नई | 70,960 रुपये प्रति 10 ग्रॅम | 77,410 रुपये प्रति 10 ग्रॅम |
बेंगळुरू | 70,960 रुपये प्रति 10 ग्रॅम | 77,410 रुपये प्रति 10 ग्रॅम |
उत्तर प्रदेश | 71,110 रुपये प्रति 10 ग्रॅम | 77,560 रुपये प्रति 10 ग्रॅम |
चांदीचा दर
आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबईत आज चांदीची किंमत 96,100 रुपये प्रति किलो आहे.