Alert For Government Scheme Beneficiaries : जर तुम्ही एखाद्या सरकारी योजनेचे लाभार्थी असाल आणी त्याद्वारे तुम्हाला आर्थिक लाभ मिळत असेल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे, कारण सध्या सरकारी योजनेच्या नावाखाली लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. (Beware of fraud under government schemes! A farmer lost over Rs 11 lakh due to a fake PM Kisan link. Learn safety tips to protect yourself from online fraud and secure your bank account).
सरकारी योजनेच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक याआधीही झाली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे पीएम किसान योजनेच्या नावावर एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिथे पीडित शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याला व्हॉट्सॲपवरील एका सरकारी योजनेच्या नावावर सुरु असणाऱ्या ग्रुपमध्ये पीएम किसान योजनेच्या नावाची लिंक सापडली, त्याने त्या लिंकवर क्लिक केले आणि त्यानंतर त्याचा मोबाइल हँग झाला. आणी त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या खात्यातून 11 लाखांहून अधिक रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचे आढळून आले आहे. असे तुमच्यासोबत कधी घडू नये यासाठी तुम्हालाही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचीही फसवणूकही होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात अशा फसवणुकीपासून वाचण्याचे उपाय काय आहेत?…
- स्वतःची फसवणूक टाळायची असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
अज्ञात लिंकवर क्लिक करू नका
कोणत्याही खोटी माहिती पसरवणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करू नका, कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका. आणी अनोळखी व्यक्तीने शेयर केलेल्या लिंकवर क्लिक करू नका. जर तुम्हाला व्हॉट्सॲप मेसेज किंवा ईमेलद्वारे अनोळखी व्यक्तीने एखादी लिंक पाठवल्यास त्या लिंकवर क्लिक करू नका. अन्यथा तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.
अज्ञात संदेशांवर विश्वास ठेवू नका
फसवणूक करणारे लोक सरकारी योजनेसाठी अर्ज केलेल्या लोकांना त्यांचे अडकलेले हप्ते मिळवून देण्याच्या नावाखाली संदेश पाठवत आहेत. अशा परिस्थितीत, आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण हे संदेश पूर्णपणे खोटे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. जर तुम्हाला एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जा किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता.
कॉलद्वारे फसवणूक
सरकारी योजनेच्या नावाखाली कॉल करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने, कागदपत्रांची पूर्तता किंवा इतर कोणत्याही बहाण्याने तुमची कागदपत्रे जमा करून घेऊन तुमच्या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. त्यामुळे, अशा कॉल्सवर विश्वास ठेवू नका आणि तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा OTP कुणासोबत शेअर करू नका.
ई-केवायसी पोर्टल किंवा सीएससी केंद्रावर करा
तुम्ही एखाद्या योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही एखाद्या योजनेसाठी नवीनच अर्ज केला असाल, तर लक्षात घ्या की फसवणूक करणारे ई-केवायसीच्या नावाखाली तुमची फसवणूक करू शकतात. यासाठी, ते तुम्हाला कॉल करून ई-केवायसी करण्यास सांगू शकतात किंवा तुम्हाला मेसेजवर लिंक पाठवू शकतात, परंतु तुम्ही अशा लिंकवर क्लिक करून तुमची माहिती भरताच तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशी चूक करू नका आणि e-KYC साठी योजनेच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्या किंवा जवळच्या CSC केंद्राला भेट द्या.