Ladki Bahin Yojana 1st Installment : लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या हफ्त्याची तारीख बदलली, ‘या’ तारखेला जमा होणार पैसे

3 Min Read
Ladki Bahin Yojana 1st Installment Date Change

Ladki Bahin Yojana 1st Installment Date News in Marathi : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्टला देण्यात येणार होता. पण काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती तारीख बदलून लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या आधीच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी, म्हणजेच १७ ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पैसे खात्यात कसे जमा होणार? जाणून घेऊयात…

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदरच योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे. 

महिलांना मिळणार आर्थिक मदत

लाडकी बहिण योजनेद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. महिलांना ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत राज्यातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. 

एकाच क्लिकवर बँक खात्यात पैसे जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या महत्वाकांक्षी आणी कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या दिवशी, महिलांना जुलै आणी ऑगस्ट या दोन महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये मिळणार आहेत. एकाच क्लिकवर सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.

🔴 यादीत नाव चेक करा 👉 Mazi Ladki Bahin Yojana List 2024: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर, येथे तुमचं नाव चेक करा.

भव्य कार्यक्रमाचे आयोजन

१७ ऑगस्टला राज्य सरकारकडून एक भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, (Cm Eknath Shinde) एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणी देवेंद्र फडणवीस आणि प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. या दिवशी राज्यातील सुमारे दोन ते अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. आतापर्यंत १ कोटी ६० लाख महिलांनी अर्ज केले असून, त्यापैकी १ कोटी २७ लाख अर्ज मंजूर झाले आहेत.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पडणार? येथे जाणून घ्या.

लाभार्थी महिला आनंदित 

लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता मिळणार असल्याचे थेट सरकारकडून जाहीर करणार आल्याने राज्यातील लाभार्थी महिला आनंदित आहेत. हा एक चांगला निर्णय आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article