Lakhpati Didi Yojana | लखपती दीदी योजना : समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महिला आणि पुरुषांनी एकत्र येण्याची गरज आहे. पुरुष आणि महिलांच्या समान योगदानानेच देशाची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होऊ शकते. या विचारानेच केंद्र सरकार देशातील महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सक्षम करण्यासाठी अनेक फायदेशीर योजना राबवत आहे. यातीलच एक महिलांसाठी फायदेशीर असणारी योजना (Government Scheme For Women) म्हणजे लखपती दीदी योजना. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देत आहे. (Lakhpati Didi Yojana offers ₹5 lakh interest-free loans to women aged 18-50, promoting financial independence. The scheme aims to empower 3 crore women through skill development and entrepreneurship, with mandatory participation in self-help groups).
लखपती दीदी (Lakhpati Didi Yojana) ही महिलांसाठी राबवण्यात येत असलेली एक विशेष कौशल्य प्रशिक्षण योजना आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत सरकारला देशातील 3 कोटी महिलांना लखपती बनवायचे आहे. लखपती दीदी योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लखपती दीदी योजनेंतर्गत सरकार महिलांना 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देत आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर महिलांना कोणतेही व्याज भरावे लागत नाही. लखपती दीदी योजनेंतर्गत उपलब्ध कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त आहे.
लखपती दीदी योजनेसाठी 18 ते 50 वयोगटातील महिल अर्ज करू शकतात. पण जर एखाद्या कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल अशा कुटुंबातील महिलेस या योजनेचा लाभ घेता येत नाही.
लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बचत गटात सामील व्हावे लागते. बचत गटात सामील झाल्यानंतर महिलेला विभागीय बचत गट कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे आणि तिची व्यवसाय योजना सादर करावी लागते.
लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
लखपती दीदी योजनेचा अर्ज करण्यासाठी इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.