लाडक्या बहिणीला 1500 तर लेकीला सरकार देणार 1 लाख 1 हजार रुपये, येथे पाहा अर्ज प्रक्रिया Maharashtra Lek Ladki Yojana 2024

4 Min Read
Lek Ladki Yojana Maharashtra 2024

Majhi Ladki Bahin योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच आणखी एका योजनेद्वारे लाडक्या लेकीला सरकारकडून 1 लाख 1 हजार रुपये दिले जात आहेत. त्या योजनेबद्दल जाणून घ्या… (Lek Ladki Yojana Maharashtra 2024)

Maharashtra Lek Ladki Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने मुलींच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक योजना सुरु केलेली आहे. (Lek Ladki Yojana 2024) लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्षे वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. लेक लाडकी योजना 2024 चा लाभ कुणाला मिळेल? अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

 लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट

 1. मुलींबाबत समाजात पसरलेली नकारात्मक विचारसरणी दूर करणे.

 2. स्त्री भ्रूण हत्येसारखे गंभीर गुन्हे थांबवणे.

 3. गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.

 4. मुलींना स्वावलंबी होण्यास मदत करणे.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना लाभ आणि वैशिष्ट्ये

महाराष्ट्रात लेक लाडकी या योजनेअंतर्गत खालील फायदे मिळतील.

 1. मुलीच्या जन्मानंतर रु 5,000 ची मदत

 2. मुलीला शाळेला पाहिलीत प्रवेश घेतल्यावर रु. 6,000

 3. मुलीला इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेतल्यावर 7,000 रु

 4. इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्यावर रु 8,000

 5. मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75,000 रु

अशा पद्धतीने या योजनेॅतर्गत महाराष्ट्रात मुलीच्या जन्मनंतर एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र पात्रता 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत:

 1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा

 2. कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे

 3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे

 4. 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाला असला पाहिजे

 5. अर्जदाराचे बँक खाते आधारशी लिंक असावे.

🔴 या योजनेबद्दल आत्ताच जाणून घ्या 👉 Pm Vishwakarma Yojana Maharashtra 2024 : काय आहे PM विश्वकर्मा योजना?, कुणाला मिळतो लाभ, येथे जाणून घ्या.

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे

Lek Ladki Yojana Documents in Marathi, अर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

 1. पालकांचे आधार कार्ड

 2. रेशन कार्ड

 3. निवास प्रमाणपत्र

 4. उत्पन्नाचा दाखला

 5. बँक खाते पासबुक

 6. मुलीचा फोटो (पालकांसह)

 7. मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो

 8. मोबाईल क्रमांक

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा?

तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे.

लेक लाडकी योजनेच्या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला आहे ते लिहायचे आहे आणी अर्जावर तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.

अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

‘महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024’ हे मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.  यामुळे गरीब कुटुंबांना आर्थिक मदत तर होईलच पण समाजातील मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून मुलींचा शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जर तुम्ही (Lek Ladki Yojana Maharashtra) या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून लेक लाडकी योजनेचा लाभ घ्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article