Pm Vishwakarma Yojana 2024 : काय आहे PM विश्वकर्मा योजना?, कुणाला मिळतो लाभ, येथे जाणून घ्या

3 Min Read
Pm Vishwakarma Yojana 2024 Details Eligibility Benefits Marathi

Pm Vishwakarma Yojana Details Marathi : आपल्या देशात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनेक सरकारी योजना चालू आहेत, तसेच सरकारकडून वरचेवर नवीन योजना सुरु केल्या जातात त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यायला हवा. पण प्रत्येक सरकारी योजनेचा सर्वांनाच लाभ मिळू शकत नाही कारण तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्या योजनेसाठी तुम्ही पात्र असणे आवश्यक आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्या योजनेची पात्रता यादी पाहावी लागेल आणि तुम्ही त्या योजनेस पात्र असाल तर, तुम्हाला त्या योजनेसाठी अंतिम मुदतीच्या आत अर्ज करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला त्या योजनेतील लाभ मिळू शकतो.

आज आपण येथे जाणून घेणार आहोत ते Pm Vishwakarma योजनेबद्दल, ही केंद्र सरकारने सुरु केलेली योजना असून ती गेल्या वर्षी सुरु करण्यात आली होती, पण आता 2024 मध्ये मोठ्या संख्येने लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आधी या योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्या आणि मग तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. चला तर मग पी एम विश्वकर्मा योजने विषयी जाणून घेऊया… (Pm Vishwakarma Yojana information in Marathi).

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞
  • योजनेचे नाव – प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजना
  • कोणाला लाभ मिळतो – 18 पारंपारिक व्यवसाय करत असणारे लोक
  • योजना कोण चालवते – भारत सरकार ही योजना चालवते
  • काय फायदा मिळतो – आर्थिक मदत मिळते

🔴 Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादीत नाव शोधा.

पी एम विश्वकर्मा योजना पात्रता | Pm Vishwakarma Yojana Eligibility

या योजनेंतर्गत, सोन्याचे दागिने बनवणारे, मिठाई बनवणारे, चपला शिवणारे, लाकडी वस्तू बनवणारे, कपडे शिवणारे, मातीच्या मूर्ती बनवणारे आणि अशा इतर अनेक पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना सरकार आर्थिक मदत करते.

Pm विश्वकर्मा योजनेतून कोणते फायदे मिळतात?

  • जर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला काही दिवसांसाठी सरकारकडून प्रशिक्षण दिले जाते आणि त्यासाठी लाभार्थ्यांना दररोज 500 रुपये स्टायपेंड दिले जाते.
  • यासोबतच इन्सेन्टिव्ह देण्याचीही तरतूद आहे.
  • योजनेच्या लाभार्थ्याला 15 हजार रुपये देखील दिले जातात ज्याचा वापर करून तुम्ही टूलकिट खरेदी करू शकता.
  • त्याच बरोबर लाभार्थ्यांना कर्ज देखील दिले जाते आणि तेही कोणत्याही हमीशिवाय आणि कमी व्याजदरात, ज्यामध्ये लाभार्थ्याला प्रथम 1 लाख रुपयांचे कर्ज आणि नंतर 2 लाख रुपयांचे अतिरिक्त कर्ज देण्याची तरतूद आहे.

पी एम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Pm Vishwakarma Yojana Documents in Marathi

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, श्रम कार्ड, कामगार कार्ड, रेशन कार्ड, चालू मोबाईल क्रमांक, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

पी एम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? | How to Apply for Pm Vishwakarma Yojana 2024 in Maharashtra

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.  जिथे तुम्हाला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ग्राहक सेवा अधिकाऱ्याला संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील. त्या कागदपत्रांच्या आधारे, तो तुमचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत जमा करतील. त्यानंतर त्याची माहिती तुम्हाला फोनवर मेसेजद्वारे मिळेल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article