LIC Jeevan Anand Scheme | LIC जीवन आनंद योजना: जर तुम्ही एखाद्या चांगल्या सुरक्षित बचत योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका अतिशय चांगल्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यात तुम्ही केवळ 45 रुपयांची बचत करून 25 लाख रुपये कमवू शकता.
एलआयसीच्या या योजनेचे नाव जीवन आनंद योजना आहे. या एलआयसीच्या जीवन आनंद योजनेत, कमी पैसे जमा जमा करून तुम्ही जास्त रक्कम मिळवू शकता. ही एलआयसीची टर्म पॉलिसी योजना आहे. यामध्ये पॉलिसीधारकाला मॅच्युरिटी बेनिफिट्स देखील मिळतात. एलआयसीच्या जीवन आनंद योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात… (Lic jeevan anand plan in marathi).
रोज फक्त 45 रुपये वाचवून 25 लाख रुपये कसे मिळतील?
तुम्ही जर दररोज 45 रुपये वाचवू शकत असाल तर या योजनेद्वारे तुम्हाला 25 लाख परतावा मिळू शकतो. एलआयसीच्या जीवन आनंद योजनेत दरमहा 1358 रुपये (म्हणजेच रोज सुमारे 45) गुंतवून, 35 वर्षाने तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी सुमारे 25 लाख रुपये परतवा मिळवू शकता.
एलआयसीची जीवन आनंद योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्ही १५ ते ३५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. एलआयसीच्या या योजनेत, तुम्हाला अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर, अपघात लाभ रायडर, नवीन टर्म इन्शुरन्स रायडर आणि नवीन गंभीर लाभ रायडरचे लाभ मिळतात.
एलआयसीच्या जीवन आनंद योजनेअंतर्गत, जर दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाला. तर अशा परिस्थितीत, नॉमिनीला 125 टक्के मृत्यू लाभ दिला जातो.
एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळत नाही. LIC जीवन आनंद प्लॅनमध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे. मात्र, त्याची कमाल मर्यादा ठरलेली नाही.
🔴 हेही वाचा 👉 पोस्ट ऑफिसमध्ये ₹500 जमा केल्यास तुम्हाला १५ वर्षाने किती पैसे मिळतील? Post Office 500 Per Month Scheme.
अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती केवळ माहिती पुरवण्याच्या उद्देशाने आहे. वैयक्तिक सल्ल्यासाठी आणी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या, आम्ही येथे कोणतीही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.