पोस्ट ऑफिसमध्ये ₹500 जमा केल्यास तुम्हाला १५ वर्षाने किती पैसे मिळतील? Post Office 500 Per Month Scheme

3 Min Read
Post Office 500 Monthly Ppf Scheme Returns 15 Years

जर तुम्हाला थोडे थोडे करून एखाद्या सुरक्षित ठिकाणी पैसे साठवायचे असतील, जेणेकरून तुम्हाला दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकेल, तर पोस्ट ऑफिसची (PPF) योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 15 वर्षे, महिना दरमहा किंवा वर्षातून 1 ते 12 वेळा पैसे जमा करू शकता.

पीपीएफ योजनेत तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपये जमा करू शकता. या योजनेची खास बाब म्हणजे या योजनेमध्ये, मूळ रकमेवर वार्षिक चक्रवाढ व्याज दिले जाते.

पोस्ट ऑफिसमध्ये दर महिन्याला 500 रुपये जमा केल्यास तुम्हाला 15 वर्षांने किती रुपये मिळतील :

Post Office 500 Per Month Scheme: पोस्ट ऑफिसच्या PPF स्कीममध्ये तुम्ही दरमहा ₹ 500 जमा केल्यास, 15 वर्षांनंतर तुम्हाला एकूण ₹ 1 लाख 62 हजार 728 रुपये मिळतील. ही रक्कम सध्याच्या 2024 मधील वार्षिक 7.1% वर्तमान व्याज दरानुसार मोजली गेली आहे. येथे आम्ही सुकन्या योजनेतील गुंतवणुकीचा हिशोब धरला नाही कारण त्या योजनेतील पैसे 21 वर्षांनंतर मिळतात.

🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज Approved झाला नाही? मग करा हे काम.

Post Office 500 Per Month Scheme Calculator:

मासिक गुंतवणूक500रु / महिना
मासिक गुंतवणूक500रु / महिना
योजनेचे नावसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
वार्षिक व्याज दर७.१%
एकूण गुंतवणूक केलेली रक्कम९० हजार रुपये
मिळालेले एकूण व्याज72 हजार 728 रुपये
तुम्हाला एकूण मिळणारे पैसे1 लाख 62 हजार 728 रुपये

🔴 ही बातमी वाचली का? 👉 पोस्ट ऑफिसने सुरु केली मालामाल स्कीम, फक्त ₹ 5000 जमा करून बना लखपती. स्कीम बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – Post Office Scheme.

पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्याची खास वैशिष्ट्ये:

ही योजना खास अशा लोकांसाठी सुरु करण्यात आली आहे ज्यांना सुरक्षित आणि करमुक्त व्याजासह त्यांची बचत वाढवायची आहे. आणी जास्त परतावा मिळवायचा आहे. ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे, म्हणजेच तुम्हाला मूळ रक्कम किंवा मिळालेल्या व्याजावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही. PPF खाते 15 वर्षांसाठी आहे, जे आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. खाते सक्रिय ठेवण्यासाठी, वर्षातून किमान एकदा 500 रुपये जमा करावे लागतील. PPF खात्यावर मिळणारे व्याज दर तिमाहीत मोजले जाते आणि चक्रवाढ व्याजाच्या स्वरूपात जोडले जाते.

पोस्ट ऑफिस पीपीएफ खाते हा केवळ एक सुरक्षित बचत पर्याय नाही तर ते कर लाभ आणि खात्रीशीर परतावा देखील देते.

अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आम्ही कोणताही आर्थिक गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी कृपया आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now