Mahila Samman Savings Certificate / महिला सन्मान बचत प्रमाणपत्र : महिलांना गुंतवणुकीसाठी अनेक फायदेशीर सरकारी योजना उपलब्ध आहेत. यापैकी एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहे. ज्या महिलांना कमी वेळेत गुंतवणूकवर चांगला परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी ही योजना खूपच फायदेशीर आहे. या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत आणि तुम्ही किती गुंतवणूक करू शकता ते जाणून घ्या…
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे मत
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की लोक आता बँकांमध्ये गुंतवणूक करण्यापासून दूर राहत आहेत. याचे कारण म्हणजे बँकेत पैसे ठेवल्यावर इतर योजना जितके व्याज देत आहेत, तेवढे बँकेत पैसे ठेवल्यावर मिळत नाही. जर आपण महिलांबद्दल बोललो तर लहान शहरे आणि खेड्यातील बहुतेक महिला चांगल्या परताव्यासाठी पैशाची एफडी करतात. पण, एफडी मधून त्यांना गुंतवलेल्या रकमेवर जास्त परतावा मिळत नाही. अशा परिस्थितीत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र नावाची योजना खूप उपयुक्त ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक केल्याने महिलांना एफडी मधून कमी वेळेत जास्त परतावा मिळतो.
Mahila Samman Yojana Mahiti
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही महिलांसाठीची एक सरकारी योजना आहे जी निश्चित परतावा देते. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या योजनेत आपले खाते उघडले होते.
– वय: 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही मुलगी किंवा महिला खाते उघडू शकते.
– खाते उघडण्याची सुविधा: कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. आता काही बँकासुद्धा हे खाते उघडण्याची सुविधा देत आहेत. यामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची वैशिष्ट्ये
- दर: वार्षिक ७.५% दराने निश्चित व्याज देत आहे. व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते. स्थिर व्याजामुळे त्यात गुंतवणूक करून शेअर बाजारासारख्या चढ-उताराचा धोका नाही.
- खाते उघडण्याची अट: कोणतीही महिला खाते उघडू शकते. जर एखाद्या महिलेला मुलगी असेल तर ती तिच्या मुलीच्या नावाने सुद्धा खाते उघडू शकते.
- कालावधी: ही योजना 2 वर्षांसाठी आहे म्हणजेच 2 वर्षानंतर खाते परिपक्व होईल आणि एकूण गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत मिळेल.
- गुंतवणूक रक्कम: यामध्ये दोन वर्षांसाठी किमान 1000 रुपये आणि कमाल 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. 1000 पेक्षा जास्त रक्कम फक्त 100 च्या पटीत जमा केली जाऊ शकते. म्हणजेच 1100, 1200…
- आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढणे: खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत एकूण जमा रकमेच्या 40 टक्के रक्कम आपल्याला काढता येते.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेत खाते उघडण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
या योजनेतून तुम्हाला किती फायदा होईल?
अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिक या योजनेपेक्षा एफडीमध्ये गुंतवणूक करून अधिक फायदे मिळवू शकतात. परंतु ज्या महिलांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. जर एखाद्या महिलेने या योजनेत 2 लाख रुपये गुंतवले तर दोन वर्षानंतर तिला 32,044 रुपये व्याज मिळेल आणि एकूण गुंतवलेली रक्कम 2,32,044 रुपये होईल.