Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest Update: रक्षाबंधन च्या दिवशी माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असून तिथून पुढे दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. जर तुम्ही ते 1500 रुपये खर्च ना करा वेगळ्या एका योजनेत गुंतवले तर त्यातून तुम्हाला 35 लाख रुपये मिळतील. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवट पर्यंत वाचा.
तुम्ही जर ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे लाभार्थी असाल तर आता तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मिळतील. आणी जर तुम्ही ते 1500 रुपये इतरत्र खर्च न करता त्याच 1500 रुपयांची गुंतवणूक करू शकत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेलं. तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून मिळालेले 1500 रुपये खर्च होऊन वाया न जाता तुम्ही केलेल्या 1500 रुपयांच्या गुंतवणूकतून भविष्यात तुम्हाला मोठी रक्कम मिळेल.
Monthly 1500 investment Plan : दर महिन्याला 1500 रुपये गुंतवून 35 लाख रिटर्न मिळवण्यासाठी तुम्हाला भारतीय पोस्टाच्या ‘ग्राम सुरक्षा योजनेत’ पैसे गुंतवावे लागतील. गुंतवणुक करण्यासाठी तसे अनेक पर्याय उपलब्ध असतात पण वेगळ्या कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवणे जोखमीचे असते. ही भारतीय पोस्टाची योजना (Post Office Scheme) असल्याने ईतर गुंतवणूकीपेक्षा यात निश्चितच कमी जोखीम असून चांगल्या परताव्याची हमी आहे.
वय वर्षे 19 ते 55 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत पैसे गुंतवून शकतो. तर या योजनेंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवली जाऊ शकते. या योजनेचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आपल्याला सोयीस्कर वाटेल तसे ठेवू शकतो. प्रीमियम भरण्यासाठी ग्राहकाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील दिला जातो.
जर तुम्ही महिन्याला 1500 रुपयांची गुंतवणूक करू शकत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. भारतीय पोस्टाने देऊ केलेली ही ग्राम सुरक्षा योजना हा एक असा पर्याय आहे, ज्यामध्ये आपण कमी जोखमीसह मोठा परतावा मिळवू शकता.
काय आहेत नियम आणि अटी?
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. तर या योजनेंतर्गत किमान रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवली जाऊ शकते. या योजनेचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते. प्रीमियम भरण्यासाठी ग्राहकाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. पॉलिसी टर्मदरम्यान डिफॉल्ट झाल्यास ग्राहक पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम भरू शकतो.
मिळवू शकता कर्ज
ही 1500 रुपये प्रति महिना योजना कर्ज सुविधेसह येते, जी पॉलिसी सुरु केल्याच्या चार वर्षांनंतर मिळू शकते. तेव्हा आपण पॉलिसी सरेंडर करू शकतो. ग्राहक 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ठ म्हणजे भारतीय पोस्टाकडून दिला जाणारा बोनस आणि शेवटचा जाहीर केलेला बोनस 65 रुपये प्रति 1,000 रुपये प्रति वर्ष दिला जाईल.
परिपक्वतेंनंतर योजनेतून होणारा लाभ
जर कोणी 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली. तर मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपयांचा परिपक्वता लाभ मिळेल. 60 वर्षांसाठी परिपक्वता लाभ 34.60 लाख रुपये असेल.
*(जर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या पैश्यातून गुंतवणूक करणार असाल आणि तुमचे वय जास्त असेल तर तुम्ही तुमची मुलगी / मुलगा ज्याचे वय कमी असेल त्याच्या नावे ही गुंतवणूक करू शकता. असं केल्यानं यातून तुम्हाला जास्त फायदा मिळेल).
- ( नवीन सरकारी योजनांबद्दलच्या लेटेस्ट बातम्या आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा).
अधिक माहिती येथे मिळवा
आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा. किंवा 1800 180 5232/155232 टोल-फ्री हेल्पलाईन वर संपर्क साधा किंवा अधिकृत वेबसाईट www.postallifeinsurance.gov.in ला भेट द्या.
अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आम्ही कोणताही आर्थिक सल्ला देत नाही. गुंतवणुक करण्यापूर्वी / कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.