महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, अदिती तटकरे यांनी व्यक्त केले आभार Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment

2 Min Read
🔴 हे वाचलं का?🤞

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Status Maharashtra : 29 सप्टेंबरला रायगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाद्वारे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता देण्यात येणार असल्याच बोललं जात होत. पण समोर आलेल्या माहितीनुसार काल पासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana’s 3rd installment has begun to reach women’s accounts. Aditi Tatkare thanks beneficiaries for their support. Learn the latest update and payment details).

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार होता पण या तारखेआधीच महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होऊ लागल्याने महिला आनंदी आहेत.

जुलै-ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होऊ लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी 6.30 नंतर अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये जमा झाले आहेत.

सद्यस्थितीत महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एक रूपयाही जमा झाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात एकाएकी 4500 रुपये जमा होऊ लागल्याने सरकारने तीनही महिन्याचे पैसे एकत्रित जमा केल्याने खात्यात पैसे जमा झालेल्या महिला आनंदी झाल्या आहेत.

ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण बँकेने हळूहळु पैसे पाठवण्यास सूरूवात केली आहे. त्यामुळे लवकरच तुमच्याही बँक खात्यात पैसे जमा होतील.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले आभार

Aditi Tatkare on Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment
Aditi Tatkare on Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment (Photo Credit: insta@ aditisuniltatkare)

Aditi Tatkare: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभाचा तिसरा हफ्ता आपल्या खात्यात जमा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. महिला सबलिकरणाच्या या क्रांतीत सहभागी होत महायुती सरकारच्या प्रयत्नांना बळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार! अशी पोस्ट शेयर करत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article