Majhi Ladki Bahin Yojana Latest News : तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र अजूनही तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही हे चेक करावे आणी जर नसल्यास तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. (Learn how to get Majhi Ladki Bahin Yojana payments after linking your bank account with Aadhaar. Payments are credited within 3 days of Aadhaar linking during the installment process).
5 ऑक्टोबर पासून माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच ज्या महिलांचे अर्ज जुलै आणी ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले होते पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे जमाचा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे मिळून 7500 रुपये जमा करण्यात येत आहेत.
तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला असेल आणी तरीही तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावे लागणार आहे.
बँके खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर किती दिवसात जमा होतील माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे?
Majhi Ladki Bahin Yojana Bank Aadhar Link,: बँक खात्याशी आधार लिंक होण्यासाठी सामान्यता 48 तास लागतात. 48 तासानंतर नवीन माहिती अपडेट होते आणी तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असल्याचे दिसते. मग DBT द्वारे पैसे जमा करताना तुमच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहे त्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातात. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक झाल्यानंतर 3 दिवसांनी बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात.
पण हे लक्षात घ्या की, जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु असते तेव्हाच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. म्हणजे, जर समजा सरकारकडून 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा करण्यात येणार असेल तर, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी 10 ऑक्टोबर पूर्वी तुमचे बँक खाते आधारशी लिंक झाले असले पाहिजे. जर तारखेनंतर तुमचे आधार बँक लिंक झाल्यास पुढच्या हफ्त्यावेळी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.