Majhi Ladki Bahin Yojana Latest News : आज, १५ ऑक्टोबर, माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख असल्याने अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी झाली आहे. काही अर्जदार, पात्रता निकषांची पर्वा न करता त्यांनाही योजनेचा लाभ मीळेल या आशेने लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करत आहेत. (Only genuine beneficiaries will receive benefits under Majhi Ladki Bahin Yojana, as per Aditi Tatkare statement. Eligibility checks and strict verification are underway).
महिला व बालविकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत, मुदतवाढीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आणि नवीन नोंदणीसाठी आजचा शेवटचा दिवस आहे.
शेवटच्या क्षणी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होत असल्याने यंत्रनेवर मोठा ताण येत आहे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडकी बहीण योजनेचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत.
“केवळ अस्सल लाभार्थींनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, आणि अर्ज पडताळण्यात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.” अशा शब्दात अदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
केवळ पात्र महिलांनाच आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी विभाग सबमिट केलेल्या अर्जांचा सखोल आढावा घेईल. शिवाय, अर्जदारांची उलटतपासणी करण्यासाठी आणि केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडून लवकरच पडताळणी मोहीम सुरू केली जाणार आहे.