महाराष्ट्र सरकारकडून नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला राज्यभरातून लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणी ऑफलाईन देखील अर्ज करता येणार आहे. या योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे. आणि एका कुटुंबातील किती महिला माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करु शकतात याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : नवीन अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना‘ (Chief Minister Ladki Bahin Yojana Maharashtra) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. माझी लडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. आता सरकारने या योजनेत काही महत्वपूर्ण बदल केले आहेत त्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एका घरातील किती महिलांना लाभ मिळणार आहे. हे जाणून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटीत तसेच निराधार महिलांना याचा फायदा मिळणार आहे. एका कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. एका कुटुंबातील दोन महिलांनाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. कोणत्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही हे अर्ज करण्यापूर्वीच जाणून घ्या…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. 8
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत झालेला बदल
ज्या कुटुंबांकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेचा लाभ मिळणार नव्हता. पण आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. तसेच अधिवास प्रमाणपत्राची आता आवश्यकता नही. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- प्रत्येक कुटुंबातील एकच महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकेल.
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?
ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान घेत असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणे खूपच सोपे आहे. आपण घरी बसून या योजनेसाठी ऑलनाईन अर्ज करु शकता. पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज भासणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील महिलांकडे 15 वर्षे जुने रेशन कार्ड असावे लागणार आहे. तसेच मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी पतीचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.
🔴 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.