लाडक्या बहिणींना सरकारकडून ५५०० रुपयांचा दिवाळी बोनस, कुणाला ५५०० कुणाला २५००? Majhi ladki Bahin Yojana Latest News

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024

Majhi ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024 Date : मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून ५५०० रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात येणार असून लाडक्या बहिणींची दिवाळी आणखीनच गोड होणार आहे. ( According to Media Reports Maharashtra government to offer a special Diwali bonus of ₹5500 under Majhi Ladki Bahin Yojana. Learn who qualifies for ₹5500 and who will receive ₹2500).

Majhi ladki Bahin Yojana Latest News : राज्य सरकारने जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला सरकारकडून १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे, महिलेचे वय २१ ते ६५ वर्षादरम्यान असले पाहिजे व सर्वात महत्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांच्या आत असायला हवे. विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील. 

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै ते नोव्हेंबर अखेरचे ५ महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले असून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर ही आहे. १५ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत नवीन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

marathi.indiatimes / मराठी.इंडियाटाइम्स (महाराष्ट्र टाईम्स), वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महायुती सरकार ऑक्टोबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना अतिरिक्त बोनस देणार आहे. संबंधित वृत्तामध्ये सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात दिवाळीचा सण असून त्याआधीच सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ३००० रूपयांचा दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. ही रक्कम महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रूपयांपेक्षा वेगळी दिली जाणार असून काही महिलांना २५०० रूपये अतिरिक्त दिले जाणार आहेत. 

अस्वीकरण: 

मराठी.इंडियाटाइम्स वर प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे ही बातमी देण्यात आली आहे. तथापि, महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा महिला बालविकास मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी झालेली नाही. याशिवाय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत दिवाळी बोनसबाबत कोणतेही अपडेट योजनेच्या अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वर पोस्ट केलेले नाहीत.  MarathiSakariYojana.in या माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही आणि वाचकांना पुष्टीकरणासाठी अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेण्याचा सल्ला देते.

Disclaimer:

This news has been reported based on information from Marathi.Indiatimes. However, there has been no official announcement or confirmation from the Maharashtra government, the Chief Minister, Deputy Chief Minister, or the Women and Child Development Ministry. Additionally, no updates regarding the Diwali bonus under the Majhi Ladki Bahin Yojana have been posted on the official scheme website (ladakibahin.maharashtra.gov.in). MarathiSarkariYojana.in does not claim the authenticity of this information and advises readers to refer to official sources for confirmation.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article