Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या

4 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Faqs

Majhi Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तुमच्या मनातील सर्व प्रश्न आणी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या.

Cm Majhi Ladki Bahan Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारने यंदाच्या नवीन अर्थसंकल्पात महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी या खास योजनेची घोषणा केली आहे.  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Chief Minister Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळतील. योजनेतील गुंतागुंत कमी होऊन ती सुलभ बनवण्यासाठी सरकारने या योजनेतील त्रुटी दूर करुन योजनेत काही बदल केले आहेत. तरीदेखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेकांच्या मनात काही प्रश्न आहेत. या योजनेसंदर्भातील लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या…

1: एका घरातील किती महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार?

21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकत्या आणि निराधार महिला आणी त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. म्हणजेच एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येईल.

2: लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

आधार कार्ड रहिवासी दाखला/ जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न दाखला / केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड,  हमीपत्र बँक पासबुक जर महिलेचा जन्म ईतर राज्यात झाला असेल तर पतीची कागदपत्रे.

3: योजनेचा अर्ज कुठे मिळणार? भरलेला अर्ज कोणत्या कार्यालयात द्यायचा?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईनसाठी अंगणवाडी केंद्रावर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावा लागेल. जिथे अगदीच अशक्य आहे, तिथे ऑफलाईन अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्रात अर्ज जमा करता येईल.

4: मोबाईलवरुन ऑनलाईन अर्ज भरता येईल का?

होय. गुगल प्ले स्टोअरवरून नारीशक्ती दूत ॲप (Narishakti Doot App) डाऊनलोड करुन तुम्ही त्यावरून मोबाईलदवरून ऑनलाईन अर्ज भरु शकता.

5: लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणे आणि संपूर्ण प्रक्रियेसाठी किती खर्च येईल?

अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे. यासाठी कोणताही खर्च येणार नाही.

6: पुणे, मुंबई यांसारख्या शहरात अर्ज कुठे भरायचा?

पुणे, मुंबई यांसारख्या शहरात अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करता येईल. तसेच संपूर्ण राज्यात कुठूनही ऑनलाईन अर्ज जमा करता येईल.

7: परराज्यात जन्म झालेल्या पण सध्या महाराष्ट्रात राहत असलेल्या महिलेला योजनेचा लाभ मिळणार का?

होय, जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल पण महिलेचा विवाह महाराष्ट्रातील पुरुषाशी झाला असेल तर त्या महिलेला योजनेचा लाभ मिळेल. पण, महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीच्या अधिवासाचे पुरावे सिद्ध करणारी कागदपत्रे अर्ज दाखल करताना द्यावी लागतील.

8: अर्जावर महिलेच्या माहेरचे नाव लिहायचे की सासरचे ?

सासर आणि माहेर दोन्ही कडील नाव लिहिता येईल अशी व्यवस्था आहे. कागदपत्रावर असलेले नाव असावे.

9: जर पांढरे रेशन कार्ड असेल तर कोणता उत्पन्न पुरावा लागेल?

पांढरे रेशन कार्ड असल्यास उत्पन्न पुरावा म्हणून उत्पन्न दाखला काढावा लागेल. आणी दाखल्यानुसार वार्षिक 2.5 लाख पर्यंतचे उत्पन्न असल्यास योजनेसाठी अर्ज करावा.

10: योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन बँक खात्याची गरज आहे का?

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन बँक खात्याची गरज नाही. तुमचे आधीपासून असलेले बँक खाते चालेल. फक्त खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

11: अर्ज कधीपर्यंत दाखल करता येईल आणि लाडकी बहिणचा पहिला हफ्ता कधी मिळणार?

आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येईल. आणी योजनेचा पहिला हफ्ता 15 ऑगस्ट 2024 ला बँक खात्यात जमा होईल.

🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता बँक खात्यात जमा होण्याची पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now