मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे पैसे या तारखेला महिलांच्या बँक खात्यात होणार जमा

2 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana First Payment Date Maharashtra 2024

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana First Payment Maharashtra Date: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होईल.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या (Maharashtra Ladki Bahin Yojna) माध्यमातून कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची रक्कम 15 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा होईल.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana : या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ.

या योजनेसाठी अर्ज भरण्याचीच प्रक्रिया अजून सुरु आहे. अर्ज भरून झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न पडला आहे. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी झाली असल्याने महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनची रक्कम जमा होणार आहेत.

.

🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List: अस तपासा यादीत तुमच नाव, जाणून घ्या तुम्हाला 1500 रुपये मिळणार की नाही?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै होती. पण अर्ज भरण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याने महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नंतर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. आणी लगेचच लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. 15 ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळेल. आणी त्यानंतर पुढे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल.

जर अजून तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही फक्त 5 मिनिटात घरबसल्या अर्ज करू शकता. कसे ते जाणून घ्या…

🔴 हेही वाचा 👉 माझी लाडकी बहिन योजनेसाठी मोबाईल वरुन फक्त 5 मिनिटात असा करा अर्ज, सगळ्यात सोपा पर्याय.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article