Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत मोबाईल भेट म्हणून देण्यात येणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यामागे नेमकी काय हकीकत आहे? तुम्हालाही या योजनेतून मोफत मोबाईल मिळेल का? त्याबद्दल जाणून घेऊयात… (Beware of viral news claiming free mobiles under Majhi Ladki Bahin Yojana. The Maharashtra government hasn’t announced any such scheme. Avoid clicking fake links or sharing personal information).
Majhi Ladki Bahin Yojana Latest News : राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना सुरू केली असून, 1 जुलै पासून या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आणी या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2024 आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये जमा करण्यात आले आहेत.
अशातच सध्या सोशल मीडियावर माझी लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी महिलांना सरकारकडून मोफत मोबाईल गिफ्ट देण्यात येणार असल्याची बातमी खूप व्हायरल होत आहे, व्हायरल झालेल्या बातमीनुसार, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना सरकारकडून मोबाईल गिफ्ट देण्यात येणार असल्याच सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र महिलांना खरच मोफत मोबाईल मिळणार आहे का?
Ladki Bahin Yojana Free Mobile Maharashtra
Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert : सध्या राज्यातील 2 कोटी 30 लाखांहून अधिक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राज्यातील महिलांना लाडकी बहिन योजनेअंतर्गत भेटवस्तू म्हणून मोबाईल फोन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
त्या व्हिडीओमध्ये सांगितलं जात आहे की, माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत तुम्हाला मोबाईल फोन मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासोबतच अर्ज करण्याची प्रक्रियाही व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे. पण खरंतर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे राज्यातील लाखो महिला फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत मोबाईल फोन भेट देण्यात येणार असल्याची ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. महाराष्ट्र सरकारने अद्याप मोफत मोबाईलबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे राज्यातील अनेक महिला फसवणुकीला बळी पडू शकतात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत महिलांना मोफत मोबाईल फोन मिळणार असल्याचे सांगण्यात येत असून यूट्यूब व्यतिरिक्त हा व्हिडिओ इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना फ्री मोबाईल मिळवण्यासाठी एक फॉर्म भरण्यास सांगितलं जात आहे व त्यासाठी एक लिंक (Ladki bahin yojana mobile gift from link) सुद्धा शेयर करण्यात आली आहे. तुम्ही अशा कोणत्याही फेक मेसेजवर विश्वास ठेवू नये, असल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये आणि कोणतेही फेक ॲप डाउनलोड करू नये, अन्यथा तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. तुम्ही जर अशा फसव्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरला किंवा लिंकवरून एखादे ॲप डाउनलोड केले तर तुमच्या बँक खात्यातील पैसे तुमच्या परस्पर काढले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही असल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करून फॉर्म भरू नये कोणत्याह ॲप्लिकेशनद्वारे आपली माहिती शेअर करू नये कारण सरकारने अद्याप याबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही किंवा अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वरही याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.