Majhi Ladki Bahin Yojana Insensitive Date : सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे हफ्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पगारात वाढ करण्यात आली. आता अंगणवाडी सेविकांना प्रतीक्षा लागली आहे ती लाडकी बहीण योजनेच्या इन्सेन्टिव्हची. लाडकी बहीण योजनेचा इन्सेन्टिव्ह कधी मिळणार?… त्याबद्दल जाणून घेऊयात… (Anganwadi Sevika to receive Majhi Ladki Bahin Yojana incentives before Diwali. Government yet to announce the official date for the ₹50 per form incentive payment).
Anganwadi Sevika Majhi Ladki Bahin Yojana Insensitive : जुलै महिन्यापासून माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत काही अनुचित प्रकार घडू लागल्याने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे काम फक्त अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले. अंगणवाडी सेविकांनीही रात्रीचा दिवस करून त्यांची जवाबदारी पार पाडली.
माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म 50 रुपये इन्सेन्टिव्ह देण्यात येणार असल्याच सरकारकडून जाहीर करण्यात आल होत.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात प्रत्येकी 5,000 रुपये आणि 3,000 रुपये वाढ करण्यात आली असून. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारे मानधन दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा करून त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्याचा सरकारचा माणस असल्याच महिला आणि बालविकास विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितल. मात्र सरकारकडून अद्याप याबाबतची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.