माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकूण 3000₹ एकत्रच देणार, अर्थमंत्री अजित पवार

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana July August Instalment 3000 rs Date

Majhi Ladki Bahin Yojana First Instalment: नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये रक्षाबंधनच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेंतर्गत महिलांना दरमाहा 1500 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून अर्ज करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत असल्याच पाहायला मिळात होत. योजनेचा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण आता योजनेत काही बदल करून अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. योजनेचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होतील याबद्दल माहिती दिली आहे. जुलै आणी ऑगस्ट दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3000 रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) दिवशी जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकूण तीन हजार रुपये रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. राज्यसरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाईल. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठीची खास योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही. तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता

  • महाराष्ट्रातील रहिवासी 
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
  • वय 65 वर्षे पेक्षा कमी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र कोण असेल?

  • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
  • घरातील सदस्य IncomeTax भरत असेल
  • कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल
  • कुटुंबाकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल
  • कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक ?

  • आधारकार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो
  • अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
  • लग्नाचे प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरता येतो.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article