Majhi Ladki Bahin Yojana Latest News : राज्यात विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुरु असलेले रजिस्ट्रेशन आज रात्री 12 नंतर बंद होणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्याचा आज 15 ऑक्टोबर हा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत दोन वेळा ही तारीख वाढवण्यात आली होती. मात्र सध्यातरी या तारखेत कोणतीही वाढ होणार नाही. अजूनही त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळेच 4500 रुपये मिळवण्याची महिलांकडे आज शेवटची संधी आहे. (Today 15th October is the last chance to register for Majhi Ladki Bahin Yojana and receive ₹4500. Register today to claim the benefits, as new registrations won’t be allowed post-deadline).
Majhi Ladki Bahin Yojana Last Date To Apply : 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या महाराष्ट्रातील रहिवासी महिला ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्या या योजनेसाठी पात्र असतील. जर तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस शिल्लक आहे. सध्या नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना त्या ज्या महिन्यात अर्ज करतील त्याच महिन्यापासूनचा लाभ देण्यात येत आहे. याआधी अर्ज पात्र ठरलेल्या महिलांना नोव्हेंबर महिन्याअखेरचा लाभ देण्यात आला आहे.
म्हणूनच जर तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर आजच तुम्ही अर्ज केला आणी जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर डिसेंबर महिन्यात तुम्हाला ऑक्टोबर ते डिसेंबर 3 महिन्याचा लाभ म्हणजेच 4500 रुपये मिळू शकतात.
निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर जरी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु केली गेली आणी जर तुम्ही तेव्हा अर्ज केलात तर तुम्हाला फक्त त्याच महिन्यांचा लाभ मिळेल. पण तेच जर तुम्ही आजच अर्ज केलात आणी तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला याच महिन्यापासूनच लाभ मिळू शकतो.
जर तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी रजिस्ट्रेशन केल नसेल किंवा तुमच रजिस्ट्रेशन अपूर्ण असेल अशा सर्व महिलांसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. आज तुम्ही लाडकी बहीण योजनेच रजिस्ट्रेशन पूर्ण करुन घ्या कारण 15 ऑक्टोबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही.