Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : लाडकी बहीण योजनेचे किती महिने हफ्ते मिळणार आहेत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहिती दिली आहे. जाणून घ्या ते काय म्हणाले… (Ajit Pawar announces that Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries will receive the next 9 months’ payments without issues. Learn more about the latest updates and payment schedule).
Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today : येत्या 10 ऑक्टोबरला माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे दोनीही हफ्ते मिळून एकत्रित 3000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढचे किती महिने मिळणार आहेत? (Ladki bahin yojana kiti mahine paise milnar), लाडकी बहीण योजना किती वर्षासाठी आहे? (Ladki bahin yojana kiti varsh ahe) असे प्रश्न महिलांकडून वारंवार विचारले जात होते. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या या प्रश्नाचं उत्तरं दिल आहे.
Mazi Ladki Bahin Yojana New Update : माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत राज्यातील 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 महिलांना पहिल्या तीन हफ्त्यांचा लाभ मिळाला असून. येत्या 10 ऑक्टोबरला लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्यांचे मिळून 3000 रुपये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले अजित पवार?
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला आहे. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे दोनीही हप्ते एकत्र येणार आहेत. मात्र त्याचबरोबर आम्ही पुढच्या नऊ महिन्यांसाठी 35 हजार कोटींची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यात कुठलीच अडचण येणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.