Majhi Ladki Bahin Yojana : सद्यस्थितीत लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार 90000 रुपये!

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Latest Update Women To Receive 90000 Rupees Over 5 Years

Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : राज्यातील करोडो महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाले असून. 31 ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात देखील लवकरच पैसे जमा करण्यात येणार आहेत. अशातच नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना पुढील ५ वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच जर आपण सरकारकडून सध्या देण्यात येणाऱ्या 1500 रुपये दर महिना या हिशोबाने पाहिले तर येत्या 5 वर्षाच्या कालावधीत माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना सरकारकडून एकूण 90000 रुपये मिळतील. (या 90 हजार रुपयांचा हिशोब सरकारकडून सध्या देण्यात येत असलेल्या 1500 रुपये हफ्त्यावरून करण्यात आला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलल्याप्रमाणे जर सध्या देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांच्या हफ्त्यात सरकारकडून वाढ करण्यात आली तर महिलांना मिळणारी ही 90000 रुपयांची रक्कम देखील निश्चितच वाढेल).

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले होते अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, विरोधक आमच्यावर टीका करत आहेत की आम्ही निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरु करून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहोत लाडकी बहीण योजना बंद पडेल. पण लाडकी बहीण योजना बंद पडण्याचा विषय तर सोडाच मी लाडकी बहीण योजनेचा सध्या असणारा 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून देण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करेन. अशक्य गोष्ट शक्य करणे हीच माझी खरी ओळख आहे. असं अजित पवार म्हणाले.

या महिलांना दर महिन्याला मिळणार पैसे

सध्या ज्यांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले आहेत आणी सरकारकडून पुढच्या हफ्त्याचे पैसे जमा करताच ज्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतील त्यांनाच पुढील 5 वर्षे लाडकी बहीण योजनेचा नियमित लाभ मिळणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता

  • महिला महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक
  • महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांमध्ये असले पाहिजे
  • विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत या सर्व महिलांना लाभ मिळणार
  • अर्ज करणाऱ्या महिलेच्या नावे बँक खात आवश्यक
  • कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • ओळखपत्र
  • बँक खाते
  • जात प्रमाणपत्र
  • रहीवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • डोमेसाईल प्रमाणपत्र
  • बर्थ सर्टिफिकेट
  • वोटर आयडी.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने नारी शक्ती दूत ॲप सुरु केले आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. ज्या महिला ऑनलाईन अर्ज करु शकत नाहीत, त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अंगणवाडी सेवक, ग्रामसेवक यांच्या मदतीने तुम्ही ऑफलाईन अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी कोणतही शुल्क आकारले जात नाही.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article