Majhi Ladki Bahin Yojana Yadi October 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तीन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणी अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमाच झाले नसतील तर तुम्हाला लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे तक्रार दाखल करावी लागणार आहे. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला अजून एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी तपासू शकता. चला तर मग जाणून घेऊयात Majhi ladki bahin yojana यादी कशी चेक करायची? (Haven’t received your Majhi Ladki Bahin Yojana payment yet? Check the beneficiary list for October 2024 to see if your name is included. Follow these steps to verify eligibility).
Majhi Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी तुम्ही डाउनलोड करून त्यात तुमचे नाव आहे की नाही ते तपासून शकता.
माझी लाडकी बहीण योजना यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जाव लागेल. आणी गुगलवर तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेशनचे नाव टाकाव लागेल. उदा. लाडकी बहीण योजना धुळे कॉर्पोरेशन यादी पाहण्यासाठी (dhule corporation ladki bahin yadi) असं सर्च करावं लागेल. आणी त्यानंतर दाखवल्या जाणाऱ्या रिझल्ट्स मधून तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईटच्या पेजवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी धुळे म्युनसिपल कॉर्पोरेशन असा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावं लागेल त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही माझी लाडकी बहीण योजना यादी डाऊनलोड करू शकता. यादी डाउनलोड केल्यावर तुम्ही तुमचं नाव किंवा अर्ज क्रमांकाच्या आधारे यादीत तुमचं नाव आहे की नाही ते चेक करू शकता. (हे लक्षात घ्या की गूगलवर दिसत असणाऱ्या रिझल्ट्स मधून तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईटवरच जावं लागेल. त्यावरच तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता).
तुमच्या कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईटवर अजून ही यादी प्रसिद्ध केली गेली नसली तर तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर एकदा लाडकी बहीण यादी चेक करा. तिथेही तुमच्या जिल्ह्याची यादी सापडली नाही तर मग तुमच्या जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडी लाभार्थी यादीबद्दल चौकशी करा.