Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौथ्या टप्प्यात 2 कोटी 22 लाख महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असूनही अद्याप तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. (Majhi Ladki Bahin Yojana: If you haven’t received your installment yet, update your Aadhaar card with your bank account. The funds will be credited within 3 days).
Majhi Ladki Bahin Yojana Fourth Installment : 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणी नोव्हेंबर दोनीही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा केले जातील अस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितल होत. आणी त्यानुसारच दि. 5 ऑक्टोबर पासूनच लाडकी बहीण योजेचे ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ( Aditi Tatkare) यांनी 5 ऑक्टोबर रोजी 2 कोटी 22 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले आल्याची माहिती दिली.
बँक खात्यात अजूनही जमा झाले नाहीत पैसे?
तुमचा माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला असेल आणी तरीही तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील. तर तुमचे आधार कार्ड अपडेट करा. तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करा. तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक झाल्यानंतर 3 दिवसात तुमच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील.