Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. महिलांच्या बँक खात्यात तिसरा हफ्ता जमा केल्याची माहिती स्वतः महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. सोबतच काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी अदिती तटकरे यांनी एक सल्ला देखील दिला आहे. (Aditi Tatkare advises women under Majhi Ladki Bahin Yojana whose payments haven’t been credited yet to report their issue to Anganwadi Sevika during the ongoing special campaign).
अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 1,96,43,207 भगिनींना तिसऱ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण झाले आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांसाठी अदिती तटकरे यांचा सल्ला
Majhi Ladki Bahin Yojana Money Not Received Yet What To Do? : लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून काही तांत्रिक अडचणींमुळे अर्ज मंजूर असूनही ज्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा या उद्देशाने शासनाद्वारे काल 2 ऑक्टोबर पासून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे ही मोहीम 8 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहील. ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील अशा महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे त्यांची तक्रार नोंद करावी.
आलेल्या तक्रारींची तक्रार निवारण समितीकडून दखल घेतली जाईल व महिलांना लवकरात लवकर लाभ दिला जाईल. अस अदिती तटकरे यांनी सांगितल.