Majhi Ladki Bahin Yojana Latest News : माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला तुमचा अर्ज मंजूर होऊनही तुमच्या खात्यात जर अजूनही लाडकी बहीण पैसे जमा झाले नसतील तर तुमच्याकडे आता फक्त 4च दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही वेळीच दखल घेतली नाही तर मग तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यात खूप अडचणी येऊ शकतात. (Majhi Ladki Bahin Yojana: If you haven’t received your payment yet, you have only 4 days to file a complaint. Act now to avoid delays due to upcoming election code of conduct).
Majhi Ladki Bahin Yojana Money Not Received Solution in Marathi : माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला तुमचा अर्ज मंजूर झाला असूनही अजून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर शासनाकडून आवाहन करण्यात आल्याप्रमाणे तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याबद्दलची तक्रार दाखल करावी लागणार आहे. अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे झाले नसल्याच्या अनेक महिलांच्या तक्रारी येऊ लागल्याने यावर उपाययोजना करून अद्याप पैसे जमा न झालेल्या महिलांना योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी 2 ऑक्टोबर पासून विशेष मोहित राबवण्यात आली आहे.
8 ऑक्टोबर पर्यंत तुमची तक्रार नोंद करा
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही खात्यात पैसे जमा झाले नसलेल्या महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राबवण्यात आलेली विशेष मोहित 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत सुरु राहणार आहे. त्यामुळेच 8 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची तक्रार नोंद करा.
4 दिवसात तक्रार नोंद न केल्यास पैसे जमा होण्यात येतील अडचणी
येत्या 15 दिवसात कधीही विधानसभा निवडणुका जाहीर हाऊ शकतात. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू होते आणी आचारसंहितेच्या काळात सर्व शासकीय योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद होत असल्याने जर तुम्ही 8 तारखेपूर्वी तुमची तक्रार दाखल केली नाही तर 10 ऑक्टोबर रोजी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकणार नाहीत. आणी त्यानंतर तुम्हाला निवडणुका होई पर्यंत वाट पाहावी लागू शकते.