लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी! …तरच मिळतील वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yonana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Mukhyamantri Annapurna Yojana 3 Free Gas Cylinders Update

Mukhyamantri Annapurna Yojana Latest News : राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु करून पीएम उज्ज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. राज्य सरकारने आता पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे याचा फायदा राज्यातील कोट्यवधी महिलांना होणार आहे. (Beneficiaries of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana must transfer gas connections to their names to receive 3 free gas cylinders annually under Mukhyamantri Annapurna Yojana. The government updates eligibility rules to benefit more women).

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु होऊन या योजनेअंतर्गत राज्यातील 2 कोटी 30 लाखांहून अधिक पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांचा लाभ देण्यात आला असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस कनेक्शन संबंधित महिलेच्या नावावर असण्याची अट सरकारकडून घालण्यात आली होती. ही योजना महिलांसाठी खूपच फायदेशीर असूनही या योजनेपासून अनेक महिला वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे आता राज्य सरकारकडून या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

बहुतांश घरातील गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर असते. त्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असूनही महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचण निर्माण होणार होती. राज्य सरकारने आता पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून, नवीन नियमानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावावर असलेले गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर हस्तांतरित करून घ्यावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article