ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्यांचे हफ्ते एकत्रच का देत आहे सरकार? Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana October November 2024 Installments

Majhi Ladki Bahin Yojana October 3000 Rupees : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना 10 ऑक्टोबरला माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणी पाचव्या म्हणजेच ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे दोनीही हफ्ते मिळून एकत्रित 3000 रुपये देण्यात येणार आहेत. यामागच नेमक कारण काय आहे? सरकारकडून अचानकच दोन महिन्याचे हफ्ते एकत्रच का दिले जात आहेत? यामागच नेमक कारण जाणून घेऊयात… (Learn why the Maharashtra government is paying both October and November installments together under Majhi Ladki Bahin Yojana on 10th October. Know the reason behind this decision).

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत  एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आणी आता लवकरच येत्या 10 ऑक्टोबरला लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या व पाचव्या हफ्त्याचे 3000 रुपये एकत्रित दिले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणी पाचव्या हफ्त्याचे पैसे एकत्रच का देत आहे सरकार? यामागच नेमकं कारण काय?

माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे 10 ऑक्टोबरला देण्यात येत आहेत. यामागच मूळ कारण निवडणुका हे आहे. पुढच्या 15 दिवसात कधीही राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. निवडणुका जाहीर झाल्या की आचारसंहिता लागू होते आणी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व शासकीय योजना तात्पुरत्या स्वरुपात बंद होतात. त्यामुळेच पुढच्या महिन्यात जर आचारसंहिता लागू झाली तर सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळेच 10 ऑक्टोबरलाच लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणी नोव्हेंबर दोनीही महिन्यांचे पैसे एकत्र देण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article