‘माझी लाडकी बहीण योजने’चे पैसे जमा झाले नाहीत तर कुठे तक्रार करायची? Majhi Ladki Bahin Yojana Payment Not Received

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Payment Not Received Complaint Maharashtra

Majhi Ladki Bahin Yojana Complaint Number : जर तुमच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर, तुम्ही याबाबत कुठे तक्रार करु शकता? जाणून घ्या… (If your Majhi Ladki Bahin Yojana payment hasn’t been received, learn how to file a complaint via the 181 helpline, Nari Shakti Doot app, or your local Anganwadi centre).

राज्यातील गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात आता तिसरा हफ्ता जमा करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यात जुलै-ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले होते त्यांच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या हफ्त्याचे 1500 रुपये, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन अर्ज केला होता आणी त्यातील ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला होता त्यांच्या खात्यात 1500 रुपये, तर ज्या महिलांचे अर्ज जुलै-ऑगस्ट महिन्यातच मंजूर झाले होते पण त्याच्या बँक खात्यात यापूर्वी एक रुपयाही जमा झाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट आणी सप्टेंबर महिन्याचे 4500 रुपये जमा करण्यात आले आहेत.

जर तुमचा माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्ज मंजूर झाला असेल पण तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही जमा झाले नसतील तर तुम्ही याबाबत कुठे तक्रार करु शकता त्याबद्दल जणून घेऊयात… (Majhi Ladki Bahin Yojana Payment Not Received Complaint Maharashtra).

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले नसतील तर तुम्ही ‘येथे’ तक्रार करू शकता

Majhi Ladki Bahin Yojana Complaint : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी केलेला तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण तुमच्या बँक खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही १८१ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तुमची पैसे जमा झाले नसल्याची तक्रार नोंदवू शकता. तसेच नारी शक्ती दूत ॲपवरूनही तक्रार नोंदवू शकता. यासोबतच तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊनही पैसे जमा झाले नसल्याची तक्रार नोंदवू शकता. एकदा तुमची तक्रार नोंदवली गेली की लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हफ्त्यासोबतच तुमचे अद्याप जमा झाले नसलेले पैसेही तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article