Majhi Ladki Bahin Yojana Latest News : 25 सप्टेंबर पासून माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे वाटप सुरु झाले आणी 29 सप्टेंबर अखेरीस एकूण 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले. (Good news for Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries! If banks have deducted funds, they are instructed to return the money to your account).
लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांच्या खात्यात 4500 रुपये तर काही महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आले. बँक खात्यात पैसे जमा झाल्याने महिला आनंदित झाल्या होत्या पण काही महिलांचा हा आनंद खूप काळ टिकू शकला नाही.
कारण खात्यात मिनिमम बॅलेन्स मेंटेन नसणे, कर्जाचा थकीत हफ्ता, डेबिट कार्ड चार्ज, आणी अशा अन्य ईतर कारणास्तव बँकांनी महिलांच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले पैसे कापून घेतले.
बँकांनी पैसे कट केल्याने हजारो महिलांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे बँका अजूनही पैसे कापून घेत असल्याच्या तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत अदिती तटकरे यांनी बँकांना आता सक्त सूचना केल्या आहेत.
कोणत्याही कारणास्तव लाडकी बहीण योजनेच्या जमा झालेल्या रकमेतून बँकांनी पैसे कापून घेऊ नयेत. जरी एखाद्या महिलेचे कर्ज थकीत असले तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या थकीत कर्जापोटी बँकांना कापून घेता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पुनः सुरु करावे. असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. शासनाद्वारे या सूचना आता सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच तुम्हाला मिळालेले लाडकी बहीण योजनेचे पैसे जर बँकेने कापून घेतले असतील तर आता बँकेकडून तुमचे पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.