Majhi Ladki Bahin Yojana Latest News : राज्यात ईथुन पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी पैशाची तरतूद केली असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. 1500 रुपयांची रक्कम लवकरच वाढवली गेली तर कुणी आश्चर्य व्यक्त करू नये. लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहिण करण्याचे काम करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. (Maharashtra CM Eknath Shinde assures the continuation of the Majhi Ladki Bahin Yojana with potential increments in financial aid. Women may also receive interest-free loans under the Lakhpati Didi Yojana to start their businesses).
Majhi Ladki Bahin Yojana Updates CM Eknath Shinde : मुंबई दिनांक 14 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील बहिनींच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत आणी ईथुन पुढेही ते नियमितपणे जमा होत राहतील. महाराष्ट्रात ईथुन पुढे लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. तसेच या योजनेतून सध्या देण्यात येणारी दरमहा 1500 रुपयांची रक्कम देखील लवकरच वाढवली गेली तर कुणी आश्चर्य व्यक्त करू नये. बहिणींना लखपती बहिणी करण्याचे काम शासन करणार आहे. नेहरूनगर कांजूरमार्ग येथे मुंबई महानगपालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजनांमुळे महिलांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पैशाची पुरेशी तरतूद करण्यात आली असून आता ही योजना बंद होणार नाही. त्यांचसोबत महिलांना स्वतःचा व्यवसाय सृरू करायचा असल्यास केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या लखपती दीदी (Lakhpati Didi Yojana) योजनेतून बिनव्याजी पैसे उपलब्ध करून दिले जातील. यामुळे भांडवलाअभावी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यात महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या अर्धवेळ कामाच्या योजनेचा 1 नोव्हेंबर पासून पुण्यात शुभारंभ होत असून यामध्ये अनेक नवीन कंपन्या जोडल्या जातील आणी मग केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यातील सर्व शहरांमध्ये महिलांना घर सांभाळत 4 तासा काम करून महिन्याला चांगले पैसे कमावता येतील. अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.