Maza Ladka Bhau Yojana Official Website : लाडका भाऊ योजना वेबसाइट सुरू, मुख्यमंत्र्यांनी शेअर केली लिंक

2 Min Read
Maza Ladka Bhau Yojana Official Website

Ladka Bhau Yojana 2024 Official Website: महाराष्ट्रातील तरुणवर्गासाठी सुरु करण्यात आलेल्या माझा लाडका भाऊ योजनेसाठी आता सरकारने अधिकृत वेबसाईट लाँच केली आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत वेबसाईटची लिंक शेअर केली आहे. वेबसाइटवरून Maza ladka bhau yojana form कसा भरायचा ते जाणून घ्या…

Maza Ladka Bhau Yojana Registration: महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुरू केलेली ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही आता माझा लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana Maharashtra 2024) या नावाने ओळखली जाऊ लागली आहे. माझा लाडका भाऊ योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकार 6 हजार ते 10 हजार रुपये विद्यावेतन देणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील युवकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी सरकारने अधिकृत वेबसाइट देखील लाँच केली आहे. जाणून घ्या नेमकी कोणती वेबसाइट आहे आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा.

Maza Ladka Bhau Yojana Website:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कौशल्य विकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते माझा लाडका भाऊ योजनेच्या (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या) पोर्टलचे अनावरण करण्यात आले. rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर उमेदवारांना, उद्योग व्यवसायांना व आस्थापनांना नोंदणी करता येणार आहे.

Maza Ladka Bhau Yojana Maharashtra साठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?

  1. नोंदणी करण्यासाठी पहिला ‘माझा लाडका भाऊ योजना’च्या rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर जा.
  2. वेबसाइटचे होम पेज ओपन झाल्यावर New User Registration या पर्यायावर क्लिक करा.
  3. क्लिक केल्यानंतर अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.
  4. अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  5. सांगण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. सबमिट पर्यायावर क्लिक करा.

Maza Ladka Bhau Yojana Documents (माझा लाडका भाऊ योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे)

  • आधार कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • चालक परवाना
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट फोटो
  • बँक पासबुक

माझा लाडका भाऊ योजनेद्वारे मिळणार केवळ 6 महिने विद्यावेतन

माझा लाडका भाऊ योजना प्रत्येक तरुणासाठी कायमस्वरूपी नाही. याबाबत जीआरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सदर कार्य प्रशिक्षणचा कालावधी ६ महिने असेल. या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. म्हणजेच आपण या योजनेचा लाभ केवळ ६ महिनेच घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article