माझा लाडका भाऊ योजना नवीन अर्जप्रक्रिया सुरु, असा करा अर्ज Maza Ladka Bhau Yojana Online Apply 2024

3 Min Read
Maza Ladka Bhau Yojana Online Apply 2024 Maharashtra

Maza Ladka Bhau Yojana Online Apply Maharashtra : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसॊबतच माझा लाडका भाऊ योजना (Majha Ladka Bhau Yojana) या योजनेची देखील घोषणा केली होती. राज्यातील तरूणांसाठी महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना सूरू केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना मोफत व्यावसायिक कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेसाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज करू शकता. (Apply for Maza Ladka Bhau Yojana 2024 to get free skill training and monthly financial aid. Learn the eligibility criteria and application process to Earn up to ₹10,000 per month).

Majha Ladka Bahu Yojana Apply Online : राज्यातील तरूणांसाठी सरकारने माझा लाडका भाऊ योजना (Majha Ladka Bhau Yojana) म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सूरू केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मोफत व्यावसायिक कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणी आनंदाची गोष्ट म्हणजे या मोफत प्रशिक्षणासोबतच सरकारकडून दर महिन्याला 6 हजार ते 10 हजार रूपये सुद्धा देण्यात येणार आहेत.

या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना दरमहा 6 हजार रुपये, पदविधारकांना 8 हजार रुपये तर पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.

माझा लाडका भाऊ योजना पात्रता | Maza Ladka Bhau Yojana Eligibility Criteria

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे
  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असले पाहिजे
  • अर्जदार किमान 12 वी पास असला पाहिजे 
  • अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा

माझा लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे | Majha Ladka Bhau Yojana Documents Required

  • आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • निवास प्रमाणपत्र
  • आधारशी लिंक बँक खाते
  • पासपोर्ट साईज फोटो

माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा | How to Apply for Maza Ladka Bhau Yojana?

  • 1: माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज  करण्यासाठी, सर्वप्रथम रोजगार महास्वयं महाराष्ट्र च्या अधिकृत वेबसाइट https://www.rojgar.mahaswayam.gov.in/ वर जावा.
  • 2: होम पेजवर असणाऱ्या रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करा.
  • 3: त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्या पेजवर ‘Verify your mobile number’ या पर्यायावर क्लिक करा.
  • 4: त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  • 5: त्यानंतर तुमची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • 6: आणी ‘Register’ या पर्यायावर क्लिक करा.

वर सांगितल्याप्रमाणे नोंदणी केल्यानंतर तुमच्या लॉगिन तपशीलासह लॉग इन करा.

  • 1: लॉगिन केल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पर्यायावर क्लिक करा.
  • 2: त्यानंतर ‘Click here to apply’ या पर्यायावर क्लिक करा.
  • 3: नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर विचारलेली सर्व माहिती भरा.
  • 4: त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल तो OTP टाका.

अशा प्रकारे तुम्ही माझा लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article