Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी केला आहे. या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेनुसार महाराष्ट्रातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. आता सरकारने माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचा देखील या योजनेत समावेश केला आहे. एका कुटुंबातील एक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र कोण? (Who is Eligible For Annapurna Yojana)
- अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावावर असली पाहिजे.
- राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी या योजनेस पात्र असतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या महिला या योजनेस पात्र आहेत.
- रेशन कार्डनुसार एका कुटुंबातील एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल.
अन्नपूर्णा योजनेसाठी कुठे अर्ज करायचा? (Where to Apply For Annapurna Yojana)
Mukhyamantri annapurna yojana maharashtra apply online :
अन्नपूर्णा योजनेसाठी पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मधील पात्र महिला पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला असल्याने सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबांची यादी तेल कंपन्यांना पाठवली जाणार आहे.
अन्नपूर्णा योजना
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप तेल कंपन्यांकडून केले जाते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या मोफत सिलिंडरचे ही वाटप तेल कंपन्यांकडून करण्यात येणार आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते. आणी नंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेमार्फत देण्यात येणारी सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्याचप्रमाणे तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यायची ५३० प्रति सिलिंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी तेल कंपन्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कसा मिळणार लाभ
- राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत (Annapurna Yojana) देण्यात येणाऱ्या ३ मोफत सिलिंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे.
- या योजनेद्वारे ग्राहकांना एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही.
- प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्र तसंच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत करम्यात आली आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून मोफत गॅस सिलिंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तसंच, इतर जिल्ह्यांसाठी जिल्हा स्तरावर समिती नेमली आहे.