आत्तापर्यंत किती महिलांच्या खात्यात जमा झाले लाडकी बहीण योजनेचे पैसे? – Majhi Ladki Bahin Yojana Third Installment Credited

2 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Third Installment Credited Women Beneficiaries

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता जमा करण्यात आला आहे. आणी आत्तापर्यंत एकूण किती महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत त्याबद्दलची सरकारी आकडेवारी समोर आली आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात… (Over 1 crore women have received the third installment of Majhi Ladki Bahin Yojana. Learn about the latest figures and updates on the financial aid here).

सुरुवातीला 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती पण सरकारकडून तारखेपूर्वीच बँकांना पैसे पाठवण्यात आल्याने पैसे जमा करण्याची प्रक्रिया लवकर सुरु झाली. दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी 34 लाख 34 हजार 388 महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले. 26 सप्टेंबरला 38 लाख 98 हजार 705 महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. आणी आज दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी आत्तापर्यंत 34 लाख 74 हजार 116 महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत.

25 तारखेला जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या पण खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा करण्यात आले त्याची एकूण रक्कम 1545.47 कोटी ईतकी होती. 26 सप्टेंबरला 584.8 कोटी तर आज 521 कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत. यानुसार आत्तापर्यंत सुमारे 1 कोटी 8 लाख 7 हजार 209 महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत.

बँकेकडून पैसे जमा करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून उद्या सकाळ पर्यंत खात्यात पैसे जमा झालेल्या महिलांची एकूण आकडेवारी समोर येईल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article