खात्यात लवकरच जमा होणार 3000 रुपये, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ Mukhyamantri Vayoshri Yojana Payment Status

2 Min Read
Mukhyamantri Vayoshri Yojana Payment Status 3000 Rs (Image credit: सोशल मीडिया)

Mukhyamantri Vayoshri Yojana : राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे, मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana) सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूर येथील गारगोटी येथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला. (CM Eknath Shinde launches Mukhyamantri Vayoshri Yojana, providing Rs 3000 to senior citizens. Learn about eligibility and payment status for this welfare scheme in Maharashtra).

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यभरातून एकूण 17 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या 40 हजार 220 लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच डीबीटीद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे 3000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पैशातून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आवश्यक असणारी सहाय्य उपकरणे खरेदी करावे तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगउपचार केंद्र इत्यादीद्वारे भरवण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

त्याचबरोबर, आता लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यामधून मुख्यमंत्री वयोश्री योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आणी त्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वयोश्री योजनेचे 3000 रुपये जमा केले जातील.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now