New Government Scheme 2024 for Womens : अमरावती येथील सायन्स स्कोर मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांसाठी असणाऱ्या इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील मुली-महिलांसाठी सुरु करण्यात येत असलेल्या नवीन योजनेबाबत माहिती दिली. (Maharashtra launching a new part-time work scheme for women, offering financial support and flexibility. Learn more about this initiative and other empowering schemes for women in 2024).
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. या थोर महिलांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्याच विचारनुसार महिलांचा विकास हा आमच्या सरकारचा अग्रकम आहे. त्यासाठी महाराष्ट्रात सरकारकडून महिलांसाठी विविध सरकारी योजना (Government Schemes For Women) राबविल्या जात आहेत.
Government Schemes for Women’s in Maharashtra : जुलै महिन्यात सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना बळ देणारी आहे. पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येत असून ही योजना निरंतर सुरू राहणार आहे. या योजनेअंतर्गत थेट महिलांच्या बॅंक खात्यात या योजनेची रक्कम जमा करण्यात येत असल्यामुळे कमी वेळात ही योजना यशस्वी झाली आहे. लाडकी बहीण योजनेसोबतच मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजनेतून लाडक्या बहिणींना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी पिंक रिक्षा योजना, बचतगटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन यासारख्या अनेक योजना महिला सशक्तीकरणासाठी राबविल्या जात आहेत.
तसेच आपल्या अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल सरकारने घेतली असून त्यांचे मानधन वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना भाऊबीजेची ओवाळणीही देण्यात येणार आहे. सोबतच अंगणवाडी सेविकांणा लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ताही लवकरच दिला जाईल.
Government Scheme for Housewife in Maharashtra : सरकारकडून लवकरच महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना सुरु करण्यात येणार आहे. काम करण्याची इच्छा असूनही घरच्या जबाबदारीने अनेक महिला पूर्णवेळ काम करू शकत नाहीत. अशा मुली-महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना तयार केलेली आहे. आणी लवकरच राज्यात ही योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील काम करण्याची इच्छा असणाऱ्या मुली-महिलांणा या नवीन योजनेद्वारे मोठी आर्थिक मदत मीळेल. अस पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.