Maharashtra Government News : छत्रपती संभाजीनगर येथे काल मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत “मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान” सोहळा संपन्न झाला. (Maharashtra govt launches Pink E-Rickshaw Scheme for women, announces salary hike for Anganwadi workers, and benefits 2.22 crore women under Majhi Ladki Bahin Yojana).
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) ही महायुती सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 5 महिन्यांचा लाभ वितरीत करण्यात आला असून एकूण 2 कोटी 22 लाख महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. लाभार्थी महिलांची संख्या लवकरच आधीच कोटी होईल अस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल.
काल झालेल्या कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात महिला आणि बालविकास विभागाने सुरु केलेल्या (Pink E Rickshaw Yojana) “पिंक ई-रिक्षा” योजनेचा शुभारंभ करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. महिलांना सक्षम करणे व सुरक्षित वातावरण देण्याच्या हेतुने आम्ही ही योजना सुरु केली आहे. राज्यामध्ये सध्या आम्ही 10,000 पिंक रिक्षा उपलब्ध करुन देत आहोत. येत्या काळात आम्ही 20,000 पिंक रिक्षा उपलब्ध करुन देणार आहे.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी करण्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनिस ह्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात प्रत्येकी 5,000 रुपये आणि 3,000 रुपये वाढ करण्यात आली असल्याच अदिती तटकरे म्हणाल्या.