2024 मध्ये इतके वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना घर बांधण्यासाठी सरकारकडून मिळते आर्थिक मदत PM Awas Yojana Eligibility

2 Min Read
PM Awas Yojana Eligibility 2024 Income Limit

Pradhan Mantri Awas Yojana Eligibility in Marathi: जे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, ग्रामीण भागात राहणारे आहेत किंवा दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत अशा लोकांसाठी सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. त्यातीलच एक ज्यांच्याकडे राहण्यासाठी कायमस्वरूपी घर नाही अशा लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणारी योजना म्हणजे पीएम आवास योजना. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेची सर्वात महत्वाची अट, वार्षिक उत्पन्नाची अट पूर्ण करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न किती असावे लागते? ते जाणून घेऊयात… (Learn about the 2024 PM Awas Yojana income limit for eligibility. Households with an annual income below…? lakh can apply for financial assistance to build a permanent home).

प्रधानमंत्री आवास योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या लोकांना कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. सध्या देशातील लोक मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेत आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न किती असावे?

पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘वार्षिक उत्पन्न मर्यादा’ ही या योजनेतील सर्वात महत्वाची अट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे लागते. तुमचे वार्षिक उत्पन्न जर 3 लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

हे लक्षात घ्या की, ज्यांच्याकडे आधीच कायमस्वरूपी घर आहे, जे सरकारी नोकरदार आहेत किंवा त्यांच्या कुटुंबात एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे, जे लोक कर भरतात किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे, इ. लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

पीएम आवास योजनेतुम कोणते फायदे मिळतात?

पीएम आवास योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते आणि सध्या मोठ्या संख्येने लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article