PM Internship Scheme Registration : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PM Internship Yojana) केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती. (Modi government launches PM Internship Scheme 2024, offering ₹5000/month to 10th pass youth. Apply from 12th October and boost your career with practical work experience).
केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत एक पोर्टल सुरू केले आहे, ज्याद्वारे कंपन्या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतील. आणी आता इच्छुक उमेदवार 12 ऑक्टोबरपासून या पोर्टलवर अर्ज करू शकणार आहेत.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना काय आहे?
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना हा एक केंद्रसरकारी उपक्रम आहे ज्याचा उद्देश तरुणांना त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्य प्रदान करणे आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती. या योजनेअंतर्गत, भारतातील 500 सर्वात मोठ्या कंपन्या त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) निधीद्वारे तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.
पिएम इंटर्नशिप योजनेसाठी पात्रता आणी अटी खालीलप्रमाणे आहेत
PM Internship Scheme Eligibility in Marathi:
- उमेदवार 10वी पास असावा
- उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे
- उमेदवाराच्या कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीसाठी नसावा
- IIT, IIM, IISER किंवा सनदी लेखापाल आणि प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल यांसारख्या प्रमुख संस्थांमधील पदवीधर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र नसतील
ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या दोन वर्षांत देशातील 3 लाख तरुणांना प्रशिक्षित केले जाईल, तर पुढील तीन वर्षांत 7 लाख तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल.