तुमच्या खात्यात आज जमा होतील का 2000? या यादीत तपासा तुमच नाव PM Kisan Yojana 18th Installment

2 Min Read
PM Kisan Yojana 18th Installment 2000 Rs Deposit

PM Kisan Yojana 18th Installment Date : आज शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. शनिवारी, 5 ऑक्टोबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 18 वा हप्ता जारी करणार आहेत. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. (PM Kisan Yojana 18th installment of ₹2,000 to be deposited today, October 5th. Check if your name is in the beneficiary list and track your payment status online).

PM Kisan Yojana 18th Installment List Check : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आज पैसे मिळणार आहेत.

आज शेतकऱ्यांची 18व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. आज शनिवारी, 5 ऑक्टोबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जारी करणार आहेत. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी 17 वा हप्ता जून 2024 मध्ये जारी करण्यात आला होता.

काय आहे पिएम किसान योजना?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये दिले जातात.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

तुमच्या पीएम किसान खात्याची स्थिती कशी तपासायची?

यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जावा.  ‘Know Your Status’ पर्यायावर क्लिक करा.  नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा आणि ‘Get Data’ या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तुमची लाभार्थी स्थिती स्क्रीनवर दिसेल.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे?

पीएम किसान योजना यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. ‘Beneficiary List’ पर्यायावर क्लिक करा. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा आणि ‘Get Report’ वर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर पीएम किसान लाभार्थ्यांची यादी दिसेल.

मदतीसाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 आणि 011-24300606 वर संपर्क साधू शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article