शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढच्या हप्त्याचा लाभ हवा असेल तर या गोष्टी करणे विसरू नका PM Kisan Yojana

2 Min Read
Pm Kisan Yojana 19th Installment Requirements

PM Kisan Yojana : केंद्र राज्य आणि सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासोबतच इतर अनेक फायदेही दिले जात आहेत. यातीलच शेतकऱ्यांसाठीची एक फायदेशीर योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी 2,000 रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 18 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता 19 वा हफ्ता देण्यात येणार आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्हाला 19 व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही कामे वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत? त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात… (Important updates for farmers! To receive the 19th installment under PM Kisan Yojana, ensure land verification, complete e-KYC, and link your Aadhaar to your bank account).

19 व्या हफ्त्याचा लाभ मिळवण्यासाठी ही कामे पूर्ण करणे महत्वाचे आहे

पहिले काम 

जर तुम्हीही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल, तर तुम्हाला सर्वप्रथम जमिनीची पडताळणी करावी लागेल. हे काम न केल्यास तुम्हाला पुढच्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. विभागाने योजनेशी संबंधित सर्व शेतकऱ्यांना हे काम पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

दुसरे काम 

जर तुम्हाला 19 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी देखील करावी लागेल. जर तुम्ही या योजनेशी नवीन जोडले गेले असाल किंवा तुम्ही आधीपासूनच लाभार्थी असाल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या हप्त्याचा लाभ मिळू शकेल. या योजनेशी संबंधित जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत ते पुढच्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

तिसरे काम 

तुम्हालाही 19 व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही आधार कार्ड लिंकिंगचे काम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल. ते न केल्यास तुमचा येणारा 19 वा हप्ता अडकू शकतो.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article