या योजनेतून असंघटित क्षेत्रातील कामगार आणी मजुरांना सरकार देते दरमहा 3000 रुपये, PM Shram Yogi Mandhan Yojana

2 Min Read
PM Shram Yogi Mandhan Yojana Monthly Pension

PM Shram Yogi Mandhan Yojana 2024 : भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार आणी मजुरांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे. पिएम श्रम योगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शनचा लाभ देते. तुम्ही जर असंघटित क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. (Learn about the PM Shram Yogi Mandhan Yojana, a pension scheme offering ₹3000 per month for unorganised sector workers after 60 years of age. Discover eligibility and benefits).

पिएम श्रम योगी मानधन योजनेचा फायदा?

पिएम श्रम योगी मानधन योजनेंतर्गत कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ३,००० रुपये पेन्शन देण्यात येते. वृद्धावस्थेत असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही एक फायदेशीर योजना आहे.

पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना कशी काम करते?

कामगार या योजनेत दरमहा जितके रुपये गुंतवतील तितकेच सरकारकडून गुंतवले जातात. उदाहरणार्थ, जर एखाद्या मजुराने या योजनेत स्वतःचे 200 रुपये जमा केले तर सरकार देखील 200 रुपये जमा करते.

पिएम श्रम योगी मानधन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

१८ ते ४० वयोगटातील कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. योजनेत नावनोंदणी केल्यानंतर, कामगारांना किमान 20 वर्षे नियमितपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळणे सुरु होते.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article